पुल कोसळले ; मोऱ्या खचल्या आणि शेतीचे मोठे नुकसान
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नारूर येथे आज सायंकाळी मोठ्या प्रमाणावर अचानक मुसळधार पाऊस कोसळून गावातील रस्त्यावरील पुल कोसळले तसेच मो-या खचल्या आहेत. कुडाळ तालुक्यातील रंगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावामध्ये ढगफुटी सारखा प्रकार झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला त्यामुळे नदी दुभडी भरून वाहू लागली तसेच गावाकडे जाणारे पुल पाण्यामुळे कोसळले तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले. या कोसळणाऱ्या पावसामुळे मो-या खचल्या आहेत. अचानक कोसळलेल्या पावसामुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.











