सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३प्रदान

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान

ओरोस (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात काल आणखी एका मानाचा पुरस्कार खोवला गेला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम केल्या बद्दल जिल्हा बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी के अरोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँक कर्मचारी संचालक देवेंद्र धुरी, सुनील फणसेकर, बँक अधिकारी निलेश कनयाळकर यांनी स्वीकारला. अविज पब्लिकेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिले जातात. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३” जाहीर करण्यात आला. गुरूवार ५आँक्टो २०२३ रोजी दमण येथे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. देशभरातील अग्रगण्य अशा ९० हुन अधिक सहकारी, अर्बन बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

error: Content is protected !!