आ.नितेश राणे, या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्याल काय ?

युवासेनेने कणकवली तालुक्यात लावलेले बॅनर ठरतायत लक्षवेधी

कणकवली (प्रतिनिधी): होऊ द्या चर्चा असे आव्हान देत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवर कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवरून आमदार नितेश राणेंना लक्ष्य केले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारलेल्या 10 प्रश्नांचे बॅनर कणकवली शहरासह तालुक्यातील महत्वाच्या पंचक्रोशी बाजारपेठे च्या ठिकाणी जनतेचे नजर पडेल असे लावण्यात आले आहेत.आमदार नितेश राणे या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्याल काय असा सवाल करत मर्मभेदी मोजके 10 प्रश्न युवासेनेने उपस्थित केले आहेत.आणि काल 5 ऑक्टोबर रोजी याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर याच प्रश्नांचे बॅनर आज कणकवली शहरासह तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आले असून हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. सध्या कणकवली शहरासह तालुक्यात याच बॅनर ची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

error: Content is protected !!