भास्कर काकड यांनी जेष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कार्याबद्दल करण्यात आला त्यांचा गौरव
खारेपाटण (प्रतिनिधी): पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर काकड यांनी जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून नुकतेच त्यांना गौरविण्यात आले असून भास्कर यांचेसह अन्य चार संस्थाचे चार कार्यकर्त्यांनाही सामाजिक न्याय पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. देशभरातील जेष्ठ नागरिकांचे न्याय्य हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या हेल्पेज इंडिया या संस्थेने भास्कर काकड यांच्या नावाची पुरस्कारासाठी राज्य शासनाकडे शिफारस केले होती. जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ प्रदान करून भास्कर काकड यांचा गौरव करण्यात आला. भास्कर काकड यांच्या या विशेष गौरवाबद्दल त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्या मधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.












