(ब्युरो न्युज) : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने सांगितले.












