खारेपाटण सह देवगड, कणकवली,राजापूर तालुक्यातील काही गावाचा वीज पुरवठा झाला होता बंद
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश गावांना वीज पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या अशा खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या २२०/१३२ के.व्ही. वीज पुरवठा केंद्रात आज रविवारी रात्री ८.०० च्या दरम्यान अचानक एका इंस्टूमेंट ला आग लागल्याने व धुराचे लोंड जमा झाल्याने एकच धावपळ उडाली स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग तातडीने विझविण्यात आली. तर सुरक्षेच्या कारणास्तव खारेपाटण सह कणकवली, देवगड राजापूर आदी भागातील गावाचा विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता.तर सुमारे दीड तासाच्या कालावधी नंतर वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.यामुळे दीड तास पेक्षा अधिक अधिक काळ येथील नागरिक आंधरात होते.
घटनेची माहिती मिळताच खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी खारेपाटण कर्यालयाचे सहाय्यक कनिष्ठ विद्युत अभियंता श्री किशोर मर्ढेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न केले.कारण काल रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलीया क्रिकेट सामना सुरू होता.तसेच खारेपाटण येथील सार्वजनिक गणपती उस्त्वनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या ढोल वादन स्पर्धेत देखील अचानक लाईट गेल्याने व्यत्यय निर्माण झाला.मात्र पुन्हा वीज कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विद्युत पुरवठा पुन्हा सुरू केल्याने स्पर्धा कार्यक्रम याशवी पार पडला.
खारेपाटण येथील महापारेषण सबस्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर फुटून पेट घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी तातडीने माहिती घेत राधानगरी फिडर लाईन वरून कणकवली शहरातील खंडित झालेला वीज पुरवत तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.तर इतर भागातील वीजपुरवठा तत्पूता रत्नागिरी जिल्हा फिडर लाईन वरून घेऊन सुरू करण्यात आला.
खारेपाटण येथील वीज सब स्टेशन केंद्रात यापूर्वी देखील मोठी आग लागून यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळून राख झाला होता. यावेळची लागलेली आग जरी कमी असली तरी यामुळे भविष्यात एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा घटनेला विद्युत मंडळाला सामोरे जावे लागेल. तरी महारष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून सब स्टेशन मध्ये अधून मधून ट्रान्सफॉर्मर ला आग लागून पेट घेण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यावर वेळीच उपाय काढणे गरजेचे आहे.












