पूर्वजांचे बांधलेले थडगे उध्वस्त करुन मेढा ग्रा.प.ने कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे मालकी हक्काच्या जागेत बांधण्यात आलेले पूर्वजांचे थडगे मेढा ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे उध्वस्त करून कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या आहेत .तरी संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी सदानंद कोचरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील सदानंद काशीराम कोचरेकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्यावर झालेल्या अन्याय बाबत त्यांचे लक्ष वेधले आहेत. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मौजे मेढा आडवेळ निवती, तालुका वेंगुर्ला येथील सर्वे नंबर ४ मध्ये असलेले आमचे पूर्वजांचे बांधलेले थडगे हे आम्हाला कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता, मेढा ग्रामपंचायत यांनी द्वेषबुद्धीतून बेकायदेशीपणे उध्वस्त केलेले आहे. तसेच खाजगी मान्यतेचे नुकसान केलेले आहे. सदरचे थडगे उध्वस्त केल्यामुळे आमच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच सदर थडग्यावर पूर्वजांची नावाची पाटी सुद्धा लावण्यात आली होती. ती गायब करण्यात आली आहे. सदर मिळकत ही खाजगी मालमत्ता आहे. तरी खाजगी मालमत्तेत असलेले पूर्वजांचे थडगे काढून टाकण्याचे हे कृत्य बेकायदेशीर आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधिता विरुद्ध गुन्हा दाखल करावा. तसेच आमचे पूर्वजांचे थडगे ज्या स्थितीत होते त्या स्थितीत पूर्ववत करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावे. अशी मागणी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज पासून सदानंद काशीराम कोचरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांना सुभाष कोचरेकर, उदय कोचरेकर, गणेश कोचरेकर, अक्षय कोचरेकर, चंद्रकांत कोचरेकर,काशीराम कोचरेकर यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.











