कुडाळ (अमाेल गाेसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये साळगाव हायस्कूल ने घवघवीत यश मिळवले इयत्ता आठवी रिझल्ट शंभर टक्के लागला असून विद्यालयामध्ये कुमारी रसिका सूर्यकांत धुरी ही प्रथम आली आहे तसेच इयत्ता पाचवी चा निकाल 72 टक्के लागला असून प्रथम क्रमांक हा विभागून आला त्यात कुमारी काव्या झारापकर आणि कुमार केदार गवस हे विद्यालयांमध्ये विभागून प्रथम आले सदर विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षिका अर्चना चव्हाण व शिक्षक विद्यानंद पिळणकर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभुतेंडोलकर सचिव मुकुंद धुरी व इतर सर्व संस्था चालकांनी अभिनंदन केले.
साळगाव हायस्कूलचे गणित संबोध परीक्षेमध्ये यश











