तळेरे (प्रतिनिधी) : उंडील गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे उंडील गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रकमेच्या नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत उंडील गावाचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करून घेतला होता. उंडील गावासाठी जलजीवन मिशन साठी तब्बल 1 कोटी 48 लाख 44 हजार 65 रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.यातील पहिल्या टप्प्यातील विठ्ठल रुखमाई वाडी, हरियाण- तानावडे वाडी, तावडेवाडी, नरवाडी, ब्राम्हणवाडी या भागातील नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी सरपंच उज्वला यादव, माजी उपसरपंच भालचंद्र मांजरेकर , ग्रामसेवक श्रीमती पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गुलशन नर ,शुशुपाल वाडेकर शर्मिला परब, ,तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा नर ग्रामस्त धर्मा नर , किशोर नर ,शंकर नर , केशव मांजरेकर , रमेश नर, सारिका नर, पुंडलिक सरवणकर , तावडे बुवा , जितेंद्र तानावडे, भाई नर शिपाई स्वप्नील राणे , ठेकेदार निलेश सावंत आदी उपस्थित होते.
उंडील गावातील जलजीवन मिशन योजनेचा उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते शुभारंभ












