खजिनदारपदी राहुल शेट्ये
तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये याची फेरनिवड करण्यात आली आहे. कासार्डे येथे माजी जि.प.सदस्य तथा सल्लागार संजय देसाई याच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी अभिजीत शेटये,राकेश मुणगेकर,सचिव सचिन राणे, सहसचिव रूपेश कानसे,खजिनदार राहूल उर्फ राजू शेटये, सहखजिनदार वैभव माळवदे याची निवड करण्यात आली.तसेच कार्यकारणी सभासद व सल्लागार याची नावे कायम ठेवण्यात आली.
दरवर्षी सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामाजपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.यावर्षी मंडळाच्या वतीने कासार्डे परिसरासाठी रुग्णवाहीका लोकार्पण व कासार्डे तिठ्ठा सेल्फी पाँईट, कट्टा उद्घाटन होणार आहे. या बैठकीस सल्लागार राजेंद्र सावंत, संतोष पारकर, संतोष कानडे, प्रकाश पारकर, रमेश मुणगेकर,गुरूप्रसाद सावंत,संतोष राणे यांच्यासह सल्लागार, सभासद व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











