खारेपाटण येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त दुर्गा देवीची प्रतिष्ठापना

देवीच्या आगमन मिरवणुकीत वारकरी दिंडी,शिवराज्यभिषेक सोहळा,लेझिम पथक व भजनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त आज घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणुकीसह खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात भक्तीभावाने करण्यात आली. यावेळी खारेपाटण एस टी बस स्थानक ते शिवाजी पेठ खारेपाटण अशी देवीची भव्य आगमण मिरवणूक झुंजार मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आली होती. या मिरवणुकीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यभिषेक सजीव देखावा सादर केला होता.शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी दिंडी विविध देव महापुरुष या मिरवणुकी दरम्यान देखाव्यात दाखवण्यात आले होते. ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. तर खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक व घेवडे बुवा यांचे भजन नागरिकांचे आकर्षण ठरले होते.

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आज देवीच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रतिष्टपणा मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये कार्यकर्ते दिगंबर राऊत,संजय कोळसुलकरर, रमेश जामसंडेकर,महेश कोळसुलकर,संतोष गाठे,प्रवीण लोकरे,मंगेश गुरव,किरण कर्ले,भूषण कोळसुलकर,संकेत लोकरे,प्रज्योत मोहिरे,शिवाजी राऊत,गणेश कारेकर,श्री पाटील ,चव्हाण, पराडकर,आदी असंख्य कार्यकर्ते देवीच्या प्रतिष्ठापना मिरवणुकी दरम्यान उपस्थित होते. पुढील नऊ दिवस झुंजार मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज देवीची भक्तीभावाने महाआरती म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

error: Content is protected !!