खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत वाचन प्रेरणा दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या राज्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त मॉडेल स्कूल शाळेत भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून रविवार दी.१५ ऑक्टोंबर २०२३ रोजी शाळेत वाचन प्रेरणा दीन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर,शाळेच्या सहाय्यक शिक्षिका रेखा लांघी, अलका मोरे,रुपाली पारकर, आरती जेजोन, अमृता ब्रम्हदंडे, अबिदा काझी आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रारंभी शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या शुभहस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक तास सामुहिक वाचनात सहभाग घेऊन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

error: Content is protected !!