श्री भगवती हायस्कुल मुणगेचे रेखाकला परीक्षेत यश!

मसुरे (प्रतिनिधी) : मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेस २९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. एक विध्यार्थी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. १४ विद्यार्थ्यांनी ‘बी’ श्रेणी, १४ विद्यार्थ्यांनी ‘सी’ श्रेणी प्राप्त केली. इंटरमिजिएट परीक्षेस ३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ‘ए’ श्रेणी मध्ये एक, ‘बी’ श्रेणी दोन विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कला शिक्षिका सौ. गौरी तवटे यांचे संस्था अध्यक्ष न ना पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर , विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्या. एम बी कुंज यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!