कणकवलीकरांची थाळी शुभारंभाला गरजूंची उसळली गर्दी ;पोटभर जेवणाने कष्टकरी झाले तृप्त

समीर नलावडे मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम

राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिनी शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : “थाळी कष्टकऱ्यांची” पंगत आपलेपणाची’ या टॅगलाईनखाली कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कणकवली थाळीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावतीने मोफत थाळी देण्यात आली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी दुपारी याकरिता अनेक कष्टकऱ्यांनी लांबच लांब रांग लावली होती. माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डाळ, भात, पुरी, उसळ, लोणचे असे पदार्थ या थाळीमध्ये देण्यात आले असून, पुढील पाच दिवसाचे बुकिंग झाले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी दिली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राजू गवाणकर, रवींद्र गायकवाड, असिफ नाईक, संजय कामतेकर, किशोर राणे, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, दिलीप वर्णे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, जावेद शेख, महेष सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!