संस्थापक केंद्रीयमंत्री नारायण राणेंची संकल्पना
कणकवली (प्रतिनिधी) : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रीय एमएसएमई मंत्री ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा (जिल्हास्तरीय) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले असुन तब्बल ३ लाख ४० हजाराची रोख पारितोषिक आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण १९ आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार वाजता कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या औचित्यावर वैचारिक मंथन व्हावे, बुध्दीवंताच्या प्रतिभेला व्यासपिठ मिळावे, कलावंताच्या कौशल्याला चालना मिळावी यासाठी हा निबंध वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती केंद्रीय एमएसएमई मंत्री ना. नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
निबंध स्पर्धा विजेत्यांना मिळणार १ लाख १३ हजारांची पारितोषीके
गट १ लाः इयत्ता ५ वी ते ७ वी
विषयः १) माझा जिल्हा माझा अभिमान, २) माझा आवडता नेता, ३) छत्रपती शिवाजी महाराज एक आराध्य दैवत, ४) टी. व्ही./मोबाईल फोन शाप की वरदान, ५) मला आवडलेली पुस्तके (शब्दमर्यादाः ५०० शब्द ) प्रथम क्रमांक १०,०००, द्वितीय क्रमांक ७०००, तृतीय क्रमांक ५००० स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ ३००० व प्रमाणपत्र
गट दुसरा: इयत्ता ८ वी ते १० वी
विषय : १) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, २) माझा भारत समर्थ भारत- सशक्त भारत, ३) संस्कार आणि – विद्यार्थी,४) चला विज्ञानवादी होऊया ५) मी कोण होणार व का ? ६) युवाशक्ती आणि भारत (शब्द मर्यादा ८०० शब्द)
बक्षिसे : प्रथम क्रमांक १५,०००, द्वितीय क्रमांक १०,००० तृतीय क्रमांक- ५००० स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ ३०००व प्रमाणपत्र गट ३ रा : महाविद्यालयीन व खुला गट
विषय : १) भारत महासत्तेच्या दिशेने, २ ) जी-२० आणि भारत, ३) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सुशासनाची ८ वर्ष, ४) एमएसएमई विभाग व्याप्ती आणि विस्तार ५) चला उद्योजक बनुया ६) छत्रपती शिवराय वैशिष्ट्य आणि विचार, ७) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या पुढील दिशा
बक्षिसे : प्रथम क्रमांक २५,००० द्वितीय क्रमांक १५००० तृतीय क्रमांक १०,००० स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ ५००० व प्रमाणपत्र ( शब्द मर्यादा : १००० शब्द)
सर्व निबंध हे लिखित व मुद्रीत अशा २ प्रतीत दि. १५ फेब्रुवारी, २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पोहोचावेत. १) संजू परब यांचे कार्यालय, रामेश्वर प्लाझा, सारस्वत बँकशेजारी, मोती तलावासमोर सावंतवाडी. मोबा. नं. ९४२२६३१८०८ / ९४२०९२४८४२, निलेश कडावलकर बजाज फ्युचरिस्टीक शोरूम, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ मोबा. नं. ९४२२४३४२४२, विवेक – सावंत- ना. नारायण राणे साहेब संपर्क कार्यालय एस. टी. स्टॅंडसमोर कणकवली. मोबा. नं. ९७६४५४०७३७, आमदार नितेश राणे संपर्क कार्यालय – श्री गणेश मंदिरसमोर सातपायरी देवगड मोबा. नं. ९५४५८९९५६१, चैतन्य नर्सिंग होम- तळेरे-वैभववाडी रस्ता तळेरे, डॉ. मिलिंद कुलकर्णी मोबा.नं. ९४२२१५४७८५, रवी मालवणकर भारत पेट्रोलपंप, मालवण शहर मोबा. नं. ९४२२६२६२६९, संजय पाटील – ग्रंथपाल बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले या ठिकाणी सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत प्रत्यक्ष जमा करावेत किंवा पोस्टाने पाठवावेत.
चित्रकला स्पर्धा : चित्रकारांना १ लाख ३९ हजाराची पारितोषिके |
गट १ ला : इयत्ता ७ वी ते १० वी (शालेय गट)
विषय : शिवजन्म प्रसंग, स्वराज्याची शपथ, माझा निसर्गरम्य सिंधुदुर्ग आणी आझादी का अमृतमहोत्सव या विषया पैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढता येईल. या स्पर्धेतील विजेत्या चित्रकारास प्रथम क्रमांक १०,००० द्वितीय क्रमांक ७,००० तृतीय क्रमांक ५,००० स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थं १०००ची आठ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
गट २ रा : ११ वी ते १५ वी (महाविद्यालयीन गट) विषय : सिंधुदुर्ग किल्ला उभारणी व शिवराय जी २० जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, २०३० मधील माझा भारत, स्वच्छ भारत अभियान या विषया पैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढता येईल. या स्पर्धेतील विजेत्या चित्रकारास प्रथम क्रमांक १५,००० द्वितीय क्रमांक ११,००० तृतीय क्रमांक ७,००० स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ २०००ची आठ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
गट ३ रा : खुला गट
विषय : आरमार व शिवराय, शिवराय व स्वामीनिष्ठ मावळे यांच्यावर आधारित कोणतेही प्रसंगचित्र, माझ्या स्वप्नातील सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड, आत्मनिर्भर भारत या विषया पैकी कोणत्याही एका विषयावर चित्र काढता येईल. या स्पर्धेतील विजेत्या चित्रकारास प्रथम क्रमांक २५,००० द्वितीय क्रमांक २०,००० तृतीय क्रमांक १५,००० स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
ही चित्रकला स्पर्धा शनिवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत प्रत्येक तालुक्यामध्ये नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी किंवा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी दि. १५ फेब्रुवारी पर्यंत नेमून दिलेल्या तालुका केंद्रप्रमुख यांच्याकडे करावी. स्पर्धेला लागणारा पेपर आयोजकांमार्फत पुरविला जाईल. शालेय गटातील व महाविद्यालयीन गटातील स्पर्धा प्रत्येक तालुक्यामध्ये होणार असून खुल्या गटाच्या स्पर्धा मात्र वैभववाडी, देवगड व कणकवली या तालुक्यासाठी कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे तर कुडाळ, वेंगुर्ला व मालवण या तालुक्यातील स्पर्धकांनी मालवण टोपीवाला हायस्कूल येथे आणि दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
तालुकावार नाव नोंदणी १५ फेब्रुवारी पर्यंत करावी. कणकवली प्रसाद राणे मोबा. नं. ९४२२३७४१२७ स्पर्धा ठिकाण विद्यामंदिर हायस्कूल – – कणकवली
वैभववाडी – मंदार चोरगे मोबा. नं. ९७६७२२२२४८ अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी देवगड राजेंद्र कोयंडे मोबा. नं. ९५४५३६३९७१ शेठ म. ग. हायस्कूल देवगड कुडाळ – संदीप चिऊलकर मोबा. नं. ८४०८९४०४१३कुडाळ हायस्कूल कुडाळ मालवण- बी. जी. सामंत मोबा. नं. ९४२३३०२३९६ टोपीवाला हायस्कूल मालवण वेंगुर्ला-समीर पेडणेकर मोबा. नं. ९४२०२५९०१२ रामचंद्र कृष्णाजी पाटकर हायस्कूल वेंगुर्ला सावंतवाडी – प्रकाश केसरकर मोबा. नं. ९५७९८३२०६९ मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव दोडामार्ग – भगवान नागरगोजे मोबा. नं. ८९७५२४४६९४ न्यू इंग्लिश स्कूल भेडशी दोडामार्ग येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.












