विश्वकर्मा मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : विश्वकर्मा मित्र मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बेलगाडा शर्यत स्पर्धा रविवार 12 फेब्रुवारी दुपारी 1 वाजल्यापासून कणकवली येथील निम्मेवाडी येथे श्री देव स्वयंभू मंदिरानजिक पार पडणार आहेत. काही नियम व अटी शर्तीसह बेलगाडा स्पर्धाना परवानगी मिळाल्यानंतर कणकवली येथे प्रथमच ही भव्य दिवस स्पर्धा पार पडणार आहे. या सर्धेतील विजेत्या बैलगाड्याला रुपये 15,000 व आकर्षक चषक तर उपविजेत्या बैलगाड्याला रुपये 10,000 व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक विजेत्या बैलगाड्याला रूपये 5000 हजार व आकर्षक चषक दिला जाणार आहे. या बेलगाड्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच अन्य जिल्ह्यातील बैलगाडा सहभागी होणार आहेत स्पर्धेचे अधिक माहितीसाठी नितीन पांचाळ (9096012514), महेश मेस्त्री, (7499337414), अक्षय मेस्त्री, प्रतीक मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विश्वकर्मा मित्र मंडळ कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.












