खारेपाटण (प्रतिनिधी): भाजपच्या महाविजय २०२४ अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले भाजप पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेकपोस्ट येथे सायंकाळी ४.४५ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्षाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,बँकेचे संचालक बाबा परब, कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार, रवींद्र शेट्ये,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, दिलीप तळेकर,रवी पाळेकर, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,भाजप महिला कार्यकर्त्या श्रीम.रत्नप्रभा वळंजू, उज्ज्वला चिके,निशा शेलार, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,कुरगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,नडगिवे सरपंच माधवी मण्यार,माजी सरपंच अमित मांजरेकर,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, इरफान मुल्ला, वायगणी उपसरपंच प्रताप फाटक,खारेपाटण भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,वीरेंद्र चिके,खारेपाटण ग्रा.प.सदस्य अमिषा गुरव ,किरण कर्ले,आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चन्द्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच येणार असल्याने त्यांचे खारेपाटण चेक पोस्ट येथे खारेपाटण – तळेरे भाजप पक्षाच्या वतीने तसेच भाजप सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. तर भाजप महिला भगिनी सुवासिनीच्या वतीने ओक्षण करून त्यांना ओवळण्यात आले.यावेळी खारेपाटण येथे मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












