दि. 11 फेब्रुवारी राेजी आयाेजन ; शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती
सावंतवाडी (प्रतिनिधी) : वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळा निमित्ताने शनिवारी अकरा वाजता समाजाच्या वतीने सायंकाळी चार वाजता शहरातून भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभा यात्रेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सहभागी होणार असून ढोल पथक चित्ररथ अशी भव्य दिव्य शोभायात्रा असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचा 35 वा वधू वर मेळावा रविवार 12 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे यावर्षी वर्ष समाजाचा शतक महोत्सवी गौरव सोहळा असल्याने हा कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे यावेळी वैश्य समाज बांधव शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, कोकण रत्न उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसुरकर व वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी हे उपस्थित राहणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी चार वाजता भव्य दिव्य शोभायात्रा काढण्याचे आयोजन करण्यात आले या या शोभा यात्रेत अवश्य बांधव सर्वेश भिसे कणकवली महिला आणि पुरुष यांचे डोळ्याचे पारणे फिटणारे ढोल पथक व नेरूर येथील चित्ररथांचा सहभाग असणार आहे. श्री श्री वामन आश्रम स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शहरातील सालईवाडा मुरलीधर मंदिर ते वैश्य भवन गवळी तेव्हा असा शोभायात्रेचा मार्ग असणार आहे तर सायंकाळी सहा ते आठ वाजता महिलांसाठी फनी गेम संगीत खुर्ची असे कार्यक्रम होणार आहेत या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग वैश्य समाज अध्यक्ष सुनील भोगटे, सावंतवाडी वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे ,स्वागताध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, वैश्य समाज सिंधुदुर्ग सचिव भार्गवराम धुरी, उपाध्यक्ष अँड पुष्पलता कोरगावकर, सेक्रेटरी शशिकांत नेवगी, खजिनदार गणेश बोर्डेकर, सदस्य दत्तप्रसाद मसुरकर, अशोक नाईक आदींनी केले आहे.