गोवेरी स्थळकरवाडी येथील जल जीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ

भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी रुपेश कानडे,अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश माडये, राजू राऊळ तसेच गोवेरी सरपंच दशरथ परब, उपसरपंच स्वरा गावडे सदस्य मोहन जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी शरद निकम, गोवेरी ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच गोलमवाडी येथील उद्घाटन राजू राऊळ, रुपेश कानडे,अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश माडये यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

error: Content is protected !!