सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेळोवेळी मागणी करुनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असलेली बाहेरचावाडा काजरेकर मोहल्ला परिसरातील पांणदीवर पडलेले खड्डे युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटने बुजविले त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
बाहेरचावाडा येथील पाणंदवर खड्डे पडल्याने तेथून वाहन चालवतांना तसेच चालतानाही रहीवाशांना त्यास सहन करावा लागत असे या पाणंदीची डागडुजी करा अशी मागणी रहिवाशांकडून लोकप्रतिनिधी तसेच पालिका प्रशासनाकडे केली जात होती मात्र याकडे दुर्लक्षच झाले होते. अखेर याबाबत परिसरातील रहिवाशांनी याबाबत उद्योजक श्री चलवाडी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी स्वखर्चातून सदरचे खड्डे सिमेंट काँक्रेट ने भरून पाणंद वाहतुकीसाठी सुस्थितीत केली.एकूणच चलवाडी यांनी तेथील रहिवाशांचा प्रश्न हाताळून सहकार्य केल्याबद्दल रहिवाशांकडून आभार व्यक्त केले जात आहे













