वैभववाडी तालुक्यातील एडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय एडगाव येथे होणार संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी): बी.के.एल.वालावलकर रुग्णालय, डेरवण ,ग्रुप ग्रामपंचायत एडगाव- वायंबोशी, श्री.रवळनाथ विकास सोसायटी एडगाव, श्री.रामेश्वर कला क्रीडा मंडळ एडगाव, रामेश्वर महिला मंडळ एडगाव, ज्योत महिला ग्रामसंघ एडगाव – वायंबोशी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय एडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार आहे ‌. या शिबिरात हर्निया,मुतखडा,मुळव्याध, प्रोस्टेट ग्रंथी, अल्सर, टॉन्सिल्स, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, चरबीच्या गाठी, पित्ताशयातील खडे, ॲपेंडिक्स, कानाच्या पडद्याची तपासणी, महिलांची गर्भाशय तपासणी व शस्त्रक्रिया, हायड्रोसेल, थायरॉईड, फायब्रोडेनोमा, स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, इम्प्लाट रिमुव्हर अशा आजारांची विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी केली जाणार आहे. शिवाय पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेला रुग्ण तपासणी दरम्यान शस्त्रक्रिया करण्यास योग्य आढळल्यास त्याची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शिबीरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी सोबत आपले मूळ रेशनकार्ड, ओळखपत्र, जुने तपासणी रिपोर्ट घेऊन शिबिर स्थळी उपस्थित राहावे. असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत एडगाव – वायंबोशी व सर्व सेवाभावी संस्था एडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!