खाजगी फायनांसकडून वसुलीसाठी ग्राहकांना शिवीगाळ, आर्थिक लूट

ग्राहकांनी मनसेशी संपर्क साधावा; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार

कणकवली (प्रतिनिधी): मागील 13 ते 14 वर्षे वाहनांना फायनांस देणाऱ्या कंपन्या व्यवसाय करत आहेत. जलदगतीने कर्ज देऊन गाड्या घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात. कर्जधारकाकडून 3 महिन्याचे चेक घेतात. दोन चेक वटल्यावर आयसी करतात.देवगड मध्ये याबाबत तक्रार आल्यानंतर तेथील कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता ग्राहकाची छळवणूक कशी केली जाते याची धक्कादायक माहिती उघड झाली.ग्राहकाला भरलेल्या पेमेंट चे स्टेटमेंट हवे असल्यास रक्कम घेतली जाते. चेक उशिरा वटला तरी दंड घेतला जातो. वसुलीसाठी सातारा परिसरातील एजन्सीकडून उद्दामपने, शिवीगाळ केली जाते.वसुली ची रक्कम हे वसुली करणारे स्वतःच्या अकाऊंट ला जमा करायला सांगतात. ग्राहकांनी भरलेल्या रक्कमेची फायनांस कंपनीकडे एंट्रीही केली जात नाही.ज्या गाड्या कर्ज थकल्याने ओढून नेल्या असतील त्या गाड्या रस्त्यावर फिरताना दिसतात. वसुली एजन्सी च्या लोकांनी ग्राहकांना आई बहिणी वरून अश्लील शिवीगाळ केली. वसुलीसाठी प्रवासखर्च 8 हजार मागितला.त्याशिवाय हफत्याची भरलेय रक्कम ग्राहकाच्या कर्ज खात्याला जमा करणार नसल्याची धमकी दिली आहे. शासनाच्या गाईड लाईन्स नुसार थकीत कर्कधारकाना शिवीगाळ करणे, विना नोटीस गाडी जप्त करू नये असे निर्देश असतानाही सिंधुदुर्गात काही खाजगी फायनांस कंपन्या थकीत कर्जधारकाकडून गाड्या ओढून नेतात. वाहनांच्या शो रूम चे डीलर कर्जप्रकरणे खाजगी फायनांस कंपनीला देतात. याला डीलर ला आर्थिक लाभ फायनांस कडून होत असण्याची शक्यता आहे. फायनांस कंपनीच्या वसुली एजन्सीकडून अन्याय झाला असेल तर मनसे शी संपर्क साधावा. याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तसेच मंत्रालयीन पातळीवर आम्ही पाठपुरावा करून ग्राहकांना न्याय मिळवून देऊ असेही उपरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!