कणकवलीत 22 ऑक्टोबर रोजी जादूटोणाविरोधी कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये रविवार दि .22 ऑक्टोबर 2023 रोजी कणकवली कॉलेज कणकवली च्या एच पी सी एल सभागृहात सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत  महाराष्ट्र शासनाचा नरबळी आणि इतर अमानुष , अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 थोडक्यात जादूटोणाविरोधी कायदा 2013 या कायद्याची  सर्व सामान्य जनतेला ओळख व माहिती व्हावी यासाठी प्रात्यक्षिकासह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यशाळेला जिल्हाधिकारी तथा पीआयएमसी अध्यक्ष  किशोर तावडे , सहाय्यक आयुक्त तथा पीआयएमसी सचिव , संतोष चिकणे ,उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली  किशोरजी सावंत, कणकवली पोलीस ठाणे येथील दक्षता अधिकारी तथा पोलीस निरीक्षक  अमित यादव, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग प्रजापती थोरात , माजी उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षण मंत्री यांचे सचिव  रामचंद्र आंगणे , मनोविकारतज्ञ मान . रूपेश पाटकर  , कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, विद्यामंदिर कणकवली चे मुख्याध्यापक  . पी जे . कांबळी ,गोपूरी आश्रम कणकवली चे अध्यक्ष प्रा डॉ राजेंद्र मुंबईकर , अभाअनिसचे राज्य उपाध्यक्ष  रविंद्र खानविलकर , अभाअनि चे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन हिंदळेकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव लिंगवत, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या संस्थापक अध्यक्षा मा .रुपाली पाटील  ‘ कणकवली येथील साहित्यिक व कवी डॉ सतिश पवार  आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .

तरी या कार्यशाळेत जास्तीत जास्त सुजाण नागरिकांनी उपस्थित राहून जादूटोणाविरोधी कायद्याची सखोल माहिती घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सरचिटणीस श्री . विजय चौकेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे .

error: Content is protected !!