खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित खारेपाटण गावातील सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आज खारेपाटण येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक श्री रफिक नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.व भक्ती भावाने देवीचे दर्शन घेतले.
झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी श्री रफिक नाईक यांचे मंडळाच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्माचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर,संतोष गाठे, गणेश लवेकर,गजानन राऊत उपस्थित होते.
खारेपाटण शिवाजीपेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात झुंजार मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या देवीचे आज मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते रफिक नाईक यांनी दर्शन घेतल्यामुळे हिंदू – मुस्लिम समाजामध्ये समतेची व एकात्मतेची भावना रुजायला मदत होणार या सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा संदेश देण्यात येत असल्याचे झुंजार मित्र मंडळाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.











