माजी नगराध्यक्ष समीर नलावडें चे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात असलेल्या पटकी देवी मंदिराजवळ आज सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त गेली काही वर्ष पटकीदेवी मित्र मंडळाच्या वतीने येथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो, गत वर्षी देखील महाआरतीच्या माध्यमातून सर्वांना निरोगी राखण्यासाठी पटकी देवी जवळ साकडे घालण्यात आले होते. कणकवली शहरातील पटकी देवीच्या स्थापनेला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. कणकवली शहरात यावर्षी पटकी देवीच्या मंदिराजवळ दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पटकी देवी बद्दल कणकवलीवासीयांची श्रद्धा आहे. त्यामुळे येत्या काळात कणकवली शहरवासीयांच आरोग्य चांगल राहावं व कणकवली शहरात यापुढे कोणतेही साथीचे रोग किंवा अन्य आजार येऊ नये याकरिता देवीला या महाआरतीच्या माध्यमातून साकडे घातण्यात येणार आहे. या महाआरतीला कणकवली शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. कणकवली शहरात काही वर्षांपूर्वी पटकीचा रोग आला होता. त्यावेळी पटकी देवीची स्थापना करून देवीला साकडे घालण्यात आले व त्यानंतर कणकवली शहरात पसरलेला हा रोग आटोक्यात आल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवरच पटकी देवीला कणकवली शहरात मोठे महत्त्व आहे. यावर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पटकी देवी मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर दांडिया महोत्सव आयोजित केला. दोन वर्षांपूर्वी आलेला कोरोना सारखा गंभीर आजार व साथीचे रोग यापुढे कणकवली शहरात येऊ नये, व शहरवासीयांचे आरोग्य सुस्थितीत राहावे याकरिता देवीला साकडे घालण्यात येणार आहे. यातूनच आज सायंकाळी 7 वाजता या महाआरतीचे आयोजन केले आहे. या महाआरती साठी 7 वाजता कणकवली शहरवासीयांनी पटकीदेवी मंदिरा जवळ यावे असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.