लेझीम,फुगडी, भजन, दांडीया , पारंपरिक वेशभूषा, साहसी खेळ अशा सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी सहभागी
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे सरस्वती पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शुक्रवारी सकाळपासून शालेय विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजनासाठी सजावट करण्यास सुरुवात केली होती. दुपारच्या सत्रात लेझीम खेळत ढोल ताशांच्या गजरात सरस्वती आगमन सोहळा पार पडला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनींनी फुगड्या देखील घालून कार्यक्रमात आपला सहभाग दर्शविला. शनिवारी सकाळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन ,आरती आदी कार्यक्रम पार पडले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.रवीवार दि.२२ रोजी विद्यार्थ्यांनी भजन गायन केले तर सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशालेतील विद्यार्थांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेनंतर मुलांसाठी दांडिया रास(गरबा) चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी लाठी काठी, दांडपट्टा फिरवून साहसी खेळ सादर केले. या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,संचालक शरद नारकर, शरद रावराणे, मुख्याध्यापक नादकर बी.एस., पर्यवेक्षक पाटील पी.एम., माध्यमिक विभाग प्रमुख पाटील एस.एस., उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सावंत पी.जे., सांस्कृतिक प्रमुख मरळकर व्ही.एस., पवार पी.बी., तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












