खारेपाटण पंचशील नगर येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दीन उत्साहात साजरा

जगाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरच – किशोर मर्ढेकर

खारेपाटण (प्रतिनिधी): “सम्राट राजा अशोक याने देखील तथागत यांना शरण येऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.आज जगातील भयानक विध्वंस अशी युद्धजण्य निर्माण झालेली परिस्थिती पाहता.जगाला पुन्हा एकदा युध्दाची नाही तर जगाला शांतीचा उपदेश करणाऱ्या बुद्धाची गरज आहे.” असे भावपूर्ण उदगार म.रा.विद्युत पारेषण कंपनीचे अभियंता श्री किशोर मर्ढेकर यांनी खारेपाटण पंचशील नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दीन कार्यक्रमात बोलताना काढले. पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचशील नगर येथील ‘बुध्द विहारात ‘ ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचेमाजी अध्यक्ष यशवंत कांबळे गुरुजी,युनिक ऍकॅडमी स्पर्धा परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र समन्वयक सचिन कोर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, तसेच बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे नवनिर्वाचित सचिव प्रभाकर पोमेडकर,संघटनेचे माजी कार्यकर्ते जितेंद्र कदम,स्थानिक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत पाटणकर, मधुकर पाटणकर, संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्ष आकांशा पाटणकर सचिव आरोही पाटणकर संघटनेचे बौद्धचार्य संतोष पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पंचशील नगर येथील डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या अर्धपुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर खारेपाटण येथील बुद्धविहारात सामुदायिक धार्मिक धम्मपुजा पाठ कु.सांची संतोष पाटणकर व कु.सुकन्या दिनेश पाटणकर यांच्या सूत्रसंचलनाखाली घेण्यात आला. यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांचे वतीने दिवंगत बंधू प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ – १० वी /१२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ यावेळी घेण्यात आला.यामध्ये खारेपाटण पंचशील नगर व सम्यक नगर खारेपाटण येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, सचिन कोर्लेकर, यशवंत कांबळे यांनी देखील कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपली अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली. तर या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदकांत कांबळे तसेच माजी अध्यक्ष मोहन पगारे व संघटनेचे सर्व आजी माजी कार्यकर्ते यांनी भेट दिली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खारेपाटण पंचशील नगर येथील महिला व लहान मुले याचेकरिता विविध स्पर्धा मंडळाच्या वतीने घेण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी केले.तर सर्वांचे आभार मंडळाचे खजिनदार संदीप पाटणकर यांनी मानले.कार्यक्रम यश्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रथमेश कदम,धीरज जुमलेकर,अशोक पाटणकर, तसेच युवा कार्यकर्ते भूषण गोवळकर, मकरंद पाटणकर,विराज पाटणकर ललित पाटणकर,भरत पाटणकर यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!