२४ तासात माजी खासदार निलेश राणे यांची नाराजी दुर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत केली यशस्वी चर्चा

मुंबई (प्रतिनिधी): माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती. त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांनी स्वतः निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. जवळपास दीड-दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

error: Content is protected !!