खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण (रजि.)मुंबई या १२ गाव संघटनेच्या ग्रामीण शाखेच्या धार्मिक तथा सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पांडुरंग कांबळे तर संघटनेच्या सचिव पदी सचिन कृष्णा कोर्लेकर यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेची सर्वसाधारण सभा वारगाव बुद्धविहार येथे संघटनेचे माजी अध्यक्ष मोहन पगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत कांबळे माजी सरचिटणीस संतोष पाटणकर मुंबई संघटनेचे अध्यक्ष दीपक कोर्लेकर,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सदर सभेत संघटनेची पुढील ५ वर्षांकरिता नवीन कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली.ती पुढील प्रमाणे – अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग कांबळे (शेर्पे), उपाध्यक्ष – दीपक केशव पगारे (नडगिवे), उपाध्यक्ष – गोपाळ सीताराम जाधव (बुरंबावडे), सरचिटणीस सचिन कृष्णा कांबळे (कोर्ले), चिटणीस – सागर प्रभाकर पोमेडकर(खारेपाटण), चिटणीस – महेंद्र कदम (कुरंगवणे), खजिनदार – दीपक भिवा जाधव (बंदरगाव), सहखजिनदर – सत्यवान जाधव(वारगाव), हिशोब तपाणीस – संदीप सावंत (उंडील) तर संघटनेच्या कार्यकारणी सदस्य पदी दीपक पवार (चिंचवली), मंगेश जानू कांबळे (साळीस्ते),अंकुश जाधव,कुणकवण यांची निवड करण्यात आली. संघटनेचे माजी अध्यक्ष श्री मोहन पगारे यांनी नवीन संघटनेच्या नवीन निवडण्यात आलेल्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. तर संघटनेचे माझी चिटणीस मंगेश कांबळे यांनी सभेला उपस्थित सर्व १२ गाव संघटनेच्या सभासदांचे आभार मानले.












