सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अकोला येथील एकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद भागवत माने (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याने मोबाईलवर ओळख करून सह्याद्री पट्ट्यातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या आईने तक्रार दिली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. काल रात्री त्याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा १३ सप्टेंबरला घडला होता. संबंधित अल्पवयीन मुलीचे त्याने अपहरण केले होते. त्यानंतर तिला दोन वेळा बोलून घेतले व तिच्यावर अत्याचार केला, असे तिच्या आईचे म्हणणे आहे. काल सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले व हवालदार मनीष शिंदे यांनी त्याला पुणे येथून ताब्यात घेतले. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले
अल्पवयीन मुलीवर अकोल्यातील युवकाकडून अत्याचार ; सोशल मीडिया चा दुष्परिणाम











