कणकवली (प्रतिनिधी) : शहरात पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी आज धडक कारवाई केली. २० दुचाकी वाहनचालकांवर ५१ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
कणकवली कॉलेज रोड, डीपी रोड कणकवली व कणकवली पटवर्धन चौक येथे दुचाकी चालकावर लायसन सोबत नाही , लायसन्स नसताना वाहन चालवणे, थांबण्याचा इशारा केला असता थांबले नाही, दुचाकी तीन सीट वाहन चालवणे, विना नंबर प्लेट, गाडीला आरसा न लावणे, वाहन चालवताना मोबाईल संभाषण अशा एकूण २० दुचाकीस्वारांवर कारवाई करत ५१ हजारांचा दंड आकारणी करण्यात आली आहे.ही कारवाई वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, आर. के. पाटील यांनी केली.











