देवगड श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम अंतर्गत शिबिरास मोठा प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल मध्ये पार पडलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम अंतर्गत देवगड तालुक्यातील पहिल्या शिबिरास खूपच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. देवगड तालुक्यातील विविध भागातील सर्व वयोगटातील स्त्री पुरुष ज्यांचा रक्तगट O+ ve/O- ve आहे अश्या 118 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला स.9-30 चालू झालेले शिबिर दू 2-00 पर्यंत चालू होते अश्या प्रकारचे देवगड मधील हे पहिलेच शिबिर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान , सिंधुदुर्ग शाखा देवगड च्या वतीने आयोजित केले होते. या प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनानुसार आलेल्या मंडळीत लहान मुलांपासून वयोवृद्ध सर्वांनी उपस्थिती दाखवत शिबिराचा लाभ घेतला तालुक्यातील सजग व्यक्ती मंडळे यांनी उत्तम सहकार्य केले. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे देवगड मधील कच्छ कडवा पाटीदार समाज म्हणजेच पटेल गुजराथी बांधव भगिनींचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात होता.रक्तदान शिबिरा साठीही हे समाजबांधव आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नेहमी अग्रेसर असतात.

बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिमे साठी जामसंडे येथिल सरिता हॉस्पिटलच्या डॉ. के. एन . बोरफळकर यांनी प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देत त्यांची रक्त तपासणी साठीची यंत्रणा देवू केली .मुख्य तंत्रज्ञ सुरज थोटम यांच्या मार्गदर्शनाखाली पौर्णिमा भडसाळे,रश्मी जाधव यांनी संपूर्ण वेळ देत चोख काम पार पाडले. या वेळी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव किशोर नाचलोणकरयांनी भेट दिली व मनोगत व्यक्त करताना बाॅम्बे ब्लड ग्रुप विषयी थोडक्यात माहिती दिली . जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, जि. सहसचिव रविकांत चांदोस्कर , जि.सल्लागार उद्धव गोरे, जि.स. विजयकुमार जोशी,महेश शिरोडकर , ह्यूमन राईटस अंबेसिडरचे अध्यक्ष दयानंद तेली ह्यांनी शिबिरास उपस्थिती दर्शविली. सिंधु रक्तमित्र चे तालुका अध्यक्ष हिराचंद तानवडे,उपाध्यक्ष प्रविण जोग, समनवयक प्रविण सावंत साहेब यांनी उपस्थित जिल्हा पदाधिकारी जे देवगडचेही प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांचे औपचारिक आणि प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत केले.नंतर सचिव प्रकाश जाधव यांनीही रक्त तपासणी साठी अलेल्यांचे स्वागत केले व मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.देवगड तालुक्यात एखाद्या मंडळास बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम राबवयाची असेल तर देवगड शाखे कडून पूर्ण सहकार्य असेल.लवकरच विजयदुर्ग पडेल विभागातही पुढील शोध मोहीम करण्याचे प्रयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!