वैभववाडीत गोकुळ दूध संघाच्या संकलन केंद्राचे आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

स्थानिक दुध उत्पादक शेतकऱ्यांनी माऊली दुध उत्पादक संघाकडे दुध संकलित करून गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे केले रावराणे आवाहन

उद्धघाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसिदास रावराणे, गोकुळ दूध संघाचे अनिल सिकरे, राजेश गावकर यांची उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात ग्रामीण भागातील शेती पुरक व्यवसायाबरोबरच वैभववाडी शहरालगत असलेल्या वाडी वस्ती मधील शेतकरी बांधवांच्या शेतीपूरक व्यवसायास चालना मिळावी व शेतीपूरक उद्योग वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने वैभववाडी शहरात गोकुळ दूध संघाच्या माऊली दुध उत्पादक संघ मर्या.वैभववाडी या संकलन केंद्राचे उद्घाटन वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.जास्तीत जास्त स्थानिक दुध उत्पादक शेतकऱ्यांनी माऊली दुध उत्पादक संघाकडे दुध संकलित करून गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन चेअरमन राजेश पडवळ यांनी यावेळी दिले.वैभववाडी तालुक्यात सहकार रुजण्यासह अधिक वृद्धींगत होताना येथील शेतकऱ्यांच्या हाताला दाम मिळवून देण्याच्या उद्देशाने गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून वैभववाडी शहरात माऊली दुध उत्पादक सहकारी संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसिदास रावराणे यांनी उद्घाटनप्रसंगी काढले. उद्धघाटन प्रसंगी उपस्थित दुध उत्पादक सभासदांना गोकुळ दूध महासंघा बद्दल अनिल सिकरे व राजेश गावकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसिदास रावराणे,गोकुळ दूध महासंघाचे अनिल सिकरे व राजेश गावकर, माऊली दुध उत्पादक संघ चेअरमन राजेश पडवळ, व्हा.चेअरमन सदानंद माईणकर, सचिव मंदार चोरगे. दुध उत्पादक शेतकरी नारायण मांजरेकर,चंद्रकांत अम्रसकर, पंडित रावराणे, सुरेंद्र रावराणे, संदिप पांचाळ, परेश सावंत, सदानंद सुतार, संतोष रावराणे, अक्षय गुरव, शुभम माळकर, राघोबा नारकर, राजेश सरवणकर, प्रथमेश पडवळ आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!