घोणसरी ग्रामविकास मंडळाकडून जि.प. शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबई कडून जिल्हा परिषद घोणसरी शाळा नं. 1 या शाळेला 32,000 रु चे साहित्य भेटवस्तू रुपात प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रोजेक्टर,10 मीटर HDMI काँड, वॉल माऊंटिंग स्टॅन्ड, आणि व्हाईट पॅनल बोर्ड यांचा समावेश आहे. यावेळी सरपंच मॅक्सी पिंटो, घोणसरी ग्राम विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष ऍड. अप्पा राणे, घोणसरी हायस्कूलचे मुख्याध्यापक गणपत राजम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सुतार, घोणसरी गावचे आरोग्य दूत मिलिंद मराठे, ग्रामपंचायत सदस्य,घोणसरी हायस्कूल व प्राथमिक शाळा नंबर 1 चे सर्व शिक्षक – विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रप्रमुख महाले सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.या भेटवस्तू मधुन शाळेची मोठी गरज पुर्ण झाल्याची कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.

मिलिंद मराठे तसेच श्री. जाधव गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून या प्रोजेक्टर रुपी भेटवस्तू निमित्त सौ. मुक्ता चव्हाण तसेच घोणसरी ग्रा. वि. मंडळ मुंबई चे अध्यक्ष अँड. अप्पा राणे यांचे विशेष आभार मानले. सरपंच मॅक्सी पिंटो यांनी आपल्या मनोगतातून सौ.मुक्ता चव्हाण यांच्या विषयी त्यांच्या कर्तुत्वाविषयी माहिती सांगताना प्राथमिक शाळेला दिलेल्या भेटवस्तू बद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले.

राजम सर यांनी आपल्या मनोगतातून या प्रोजेक्टर भेटी मागची संस्थेचे अध्यक्ष अँड. अप्पा राणे यांची भूमिका मांडली तसेच याचा उपयोग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अँड. अप्पा राणे यांच्या हस्ते प्रोजेक्टर चालू करून ऊद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतातून सौ. मुक्ता चव्हाण यांच्या सामाजिक तळमळी विषयी तसेच त्यांनी घोणसरी हायस्कूल साठी केलेल्या भरघोस मदतीविषयी ऋण व्यक्त केले. त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ त्यांनी उपस्थितांसमोर कथन केली व भविष्यातही आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या गावाचा विकास साधूया असे मत व्यक्त केले. गावातील सर्व शाळांच्या विकासाबद्दल त्यांनी कटिबद्धता व्यक्त केली. घोणसरी नं.१ च्या मुख्याध्यापीका सौ.बेळणेकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!