सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कला उत्सव २०२३ स्पर्धेत खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयाचे घवघवीत यश

कु.आर्या मोसमकर हिचा प्रशालेच्या वतीने सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय या प्रशालेतील कु. आर्या अनिल मौसमकर हीचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कला उत्सव २०२३ या स्पर्धेमध्ये हार्मोनियम वादन या वाद्य वादन प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तर पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कु.आर्या मोसमकर ही प्रतिनिधित्व करणार आहे.

कसाल हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या जिल्हास्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण प्रशालेतील कु.आर्या अनिल मोसमकर या नववीतील विद्यार्थिनीने स्वर वाद्य वादन या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्ह्यातील अनेक हायस्कूल मधील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.. तर या स्पर्धेत कु.आर्या हिची पुणे येथे होणाऱ्या राज्य स्तरीय कलाउत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नुकताच कु.आर्य हिचा खारेपाटण हायस्कूलच्या वतीने अध्यक्ष प्रवीण लोकरे,खारेपाटण मंडळ अधिकारी श्रीम.एस आर बावलेकर व खारेपाटण तलाठी श्रीम. अरुणा जयानावर यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.व तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच या कला उत्सव स्पर्धेमध्ये कु. पूर्वा इस्वलकर, कु. सई लोकरे, कु. रिद्धी धुमाळ, कु. आयुष मांगले यांनीही विविध कला प्रकारांमध्ये आपापले कला सादरीकरण उत्तम प्रकारे केले .या सर्व विद्यार्थ्यांना खारेपाटण प्रशालेचे संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडूरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे माजी विद्यार्थी धनंजय मौसमकर व सौ.अनुजा अभय ठाकूरदेसाई यांचे विशेष सहकार्य लाभले वरील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत तसेच, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. आर्या व इतर सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!