शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळणे गरजेचे तर ना.नारायण राणे हे मराठा समाजाची ताकद – जयेंद्र रावराणे

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी घेतली वैभववाडी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी जयेंद्र रावराणे यांची भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात व मनोज जरांगे -पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वैभववाडीत आज अर्जुन रावराणे विद्यालय येथे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत वैभववाडी तालुक्यातील सकल मराठा समाज्याच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले  यावेळी मराठा समाज व कुणबी यातील फरक तसेच साम्य, मागासवर्गीय आयोग याशिवाय आरक्षणासंदर्भातील विश्लेषण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नेमलेल्या समितीत्या त्यांनी मागासवर्गीय आयोगाकडे नोंदविल्या नोंदी या सर्वांची माहिती उपस्थित मराठा बांधवांना दिली. आज शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजातील मुलांना उत्तम गुण मिळवून देखील नोकरभरतीत पदरी निराशाच येते त्यामुळे त्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण थांबविण्यासाठी शैक्षणिकदृष्या मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे शिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी डिसेंबर २०१२ साली नेमलेल्या राणे समितीने मराठा समाजासाठी घेतलेला पुढाकार विसरून चालणार नाही. ना.नारायण राणे व आ.नितेश राणे किंबहुना राणे कुटुंबीय ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाची ताकद आहे त्यामुळे त्यांच्या ९६ कुळी मराठा व कुणबी मराठा या भूमिकेशी आपण सर्वजण मराठा बांधवांनी सहमत असले पाहिजे असं मत मा.वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी यावेळी व्यक्त केले. 

        या  मनोज जरांगे -पाटील यांच्या समर्थनार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅलीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, जयेंद्र रावराणे, उद्योजक गिरीधर रावराणे व अन्य मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!