चिंदर गावच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार- पालकमंत्री रविंद्र चव्हाण…..!

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशासकीय मंजूरी असलेल्या चिंदर सडेवाडी ते माऊली मंदिर ग्रा.मा. 59, चिंदर भगवंतगड रस्ता, तेरई भगवंत गड रस्ता व भटवाडी येथे मंजूर बी, एस्, एन, एल् टाँवर अशा कामांचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले कि चिंदर गावाशी माझे जवळचे संबध आहेत व या गावातील राहिलेले विकास कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील. तसेच माजी खासदार निलेश राणे व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर हे चांगल्या प्रकारे काम करत असून आपण त्यांच्या पाठिशी सदैव उभे आहोत. यावेळी देवस्थानच्यावतीने अनिल घाडी, अरविंद घाडी, मधुकर पाताडे यांच्या हस्ते माऊलीची प्रतिमा देवून तसेच अल्पसंख्यांक भाजप जिल्हाध्यक्ष व ख्रिश्चन समाज, संतोष कोदे व मंगेश गांवकर यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विधानपरिषदेचे निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, राजु राऊळ, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजू निकम, विरेश पवार, राजन गांवकर, राजन पांगे, संतोष कोदे, संतोष गांवकर, मंगेश गांवकर, नारायण पाताडे, सचिन हडकर, चिंदर सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वै, महेंद्र मांजरेकर, शशीकांत नाटेकर, सानिका चिंदरकर, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, मनोज हडकर, रवि घागरे, अरविंद घाडी, अनिल घाडी, भाई अपराज, हिमाली अमरे, दक्षता सुर्वे, स्वाती सुर्वे, भाई तावडे, प्रिया पालकर, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, राजु त्रिंबककर, सुनिल पवार, पळसंब सरपंच महेश वरक, चंदू सावंत, सुमित सावंत, प्रफुल्ल प्रभू तसेच चिंदर व तालुक्यातील बहूसंख्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!