अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

कणकवली (प्रतिनिधी) : आधार सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील यशवंत राव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिनेत्री अक्षता कांबळी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त असलेल्या मा .ह.भ.प.डॉ सौ मनीषा ताई गुरव (नाडी तज्ञा) व आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिनेश मेटकरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .गेली पंधरा वर्षे आपल्या अभिनय क्षेत्राबरोबर समाज सेवा जोपासणाऱ्या अक्षता ताई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे .या वेळी आधार सेवा समिती चे अध्यक्ष श्री दिनेश मेटकरी , कराड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, आयुश भारत डॉ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अमीर मुलागी , कराड शहर पालिस उपनिरीक्षक सौ रेखा देशपांडे , अभिनेते बलराज माने ,अभिनेते गौरव भोसले,अभिनेता निर्माता आदित्यराजे मराठे ,अभिनेत्री ऐश्वर्या धौड ,अभिनेत्री श्रुतिका सावंत,संभाजी ब्रिगेड चित्रपट संस्था पुणे अध्यक्ष प्रकाश धिंडले दिग्दर्शक व्यंकटेश कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!