सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाजपा संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आज भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आणि त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सुरू केलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण तत्परतेने कार्य केले पाहिजे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपण सर्वांनी राष्ट्रहिताच्या कार्यात जास्तीत जास्त योगदान दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार निलेश राणे, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!