महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढणे पडले महागात

कसाल मधील नंदकुमार वनकर विरोधात गुन्हा दाखल

ओरोस (प्रतिनिधी) : कॉलेज मुलींचे व महिलांचे त्यांच्या नकळत समोरून आणि मागच्या बाजूने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढल्या प्रकरणी कसाल गांगोची राई येथील ५० वर्षीय नंदकुमार लक्ष्मण वनकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुडाळ तालुक्यातील ढोकमवाडी येथील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. कसाल बाजारपेठ येथे २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेच्या नंदकुमार वनकर हे आपल्या आपल्या ताब्यातील मोबाईल द्वारे कॉलेज मुली व महिलांचे फोटो काढत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली असता संशयित आरोपी नंदकुमार वनकर तेथून पळून गेले. त्यानंतर याबाबत त्या महिलेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार वनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती नागरगोजे या अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!