खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकलंगले तालुक्यामध्ये वातावरण तापले.मराठा आरक्षणाला होणाऱ्या विलंबामुळे मराठा समाजामध्ये आता संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते आहे.अजूनही अनेक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्यानं आता मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतायत. सकल मराठा समाज पंचक्रोशी, पेठ वडगाव यांनी हातकणंगले मतदार संघातील खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात अनोख आंदोलन केलंय. त्यांनी “खासदार हरवला आहे” असा फलक उभारलाय. त्या फलकावर “वर्ण- गोरा, दाढी वाढवलेली, मराठा समाजाची मते घेवून समाजाची फसवणूक केली आहे. कुठे आढळल्यास मतदार संघात पाठवणी करावी. लवकरात लवकर परत ये कोणीही रागवणार नाही, तुझी खूप आठवण येते…! सकल मराठा समाज पंचक्रोशी, पेठ वडगाव” असा मजकूर आहे.

error: Content is protected !!