आमदार नितेश राणेंच्या हस्ते पुलाचे करण्यात आले भूमिपूजन
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट- फोंडेकरवाडी येथील नवीन पुलाचे भूमिपूजन आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आ. राणे यांच्या प्रयत्नाने बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी १ कोटी १६ लाख ५३ हजार ६७५ रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल गावकऱ्यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आ. नितेश राणे यांचे आभार मानले.
भूमिपूजन शुभारंभाप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा महाराष्ट्र राजन चिके, सरचिटणीस मनोज रावराणे, माजी सभापती बबन हळदीवे, सुजाता हळदिवे, सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, सुरेश सामंत, भाई भालेकर, माजी सरपंच संतोष आग्रे, बूथ अध्यक्ष हेज फोंडेकर, सुनील लाड, एकनाथ काथरुड, नितीन पालकर, दीपक आरेकर, अमर फोंडेकर, अमित फोंडेकर, संजय फोंडेकर, प्रमोद फोंडेकर, सुहास लाड, संजय लाड, महेश सावंत, पुंडलिक आरेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत पारकर, सुभाष सावंत, विठ्ठल लाड, स्नेहलता पांचाळ, प्रज्ञा शिंदे, शक्ती प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.











