आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली
कणकवली (प्रतिनिधी): शहरातील गोकुलधाम हॉटेल खाली श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला दुपारी २:३०चा सुमारास आग लागली यात दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले मात्र तातडीने आगीवर नियंत्रनात आणली त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली ही या शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकान मालक संजीव शिरसाट हे दुकान बंद करून घरी गेले होते दरम्यान दुकानातून दूर येत असल्याची कल्पना शेजाऱ्यांनी दुकान मालकाला दिली दुकान मालक आणि दुकान मालक तातडीने धाव घेत लगेच शटर उघडले यावेळी दुकानाचे काउंटर व पुढील भागाला आग लागली होती अग्निविरोधक यंत्राच्या माध्यमातून आगीवर तातडीने नियंत्रण करण्यात आले. तसेच नगरपंचायतीचे बंब ही घटनास्थळी दाखल झाले होते आग तातडीने विजवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आगी बाबत माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, अनिल हळदीवे आनंद पारकर पंकज पेडणेकर, साहिल शंकरदास, तुषार मोरे, प्रतीक कुडाळकर, यश मोडक, नगरपंचायतीचे मनोज धुमाळे, गणेश लाडे, विनोद चव्हाण, ताम्हणकर यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील तलाठी सुवर्ण कडुलकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.













