महिलांकरिता व 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकरिता प्रवास दरात 50% सवलत
75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींकरिता शंभर टक्के मागणीप्रमाणे साध्या बसेस उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी): कार्तिकी यात्रेकरिता सिंधुदुर्ग विभागातून प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर यात्रेस जादा बसेस मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गतवर्षी या विभागातून 35 बसेस कार्तिकी यात्रे करिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार यावर्षी देखील सदर बसेस उपलब्ध आहेत. या बसेस प्रवाशांच्या सोयीनुसार त्यांच्या इच्छित स्थळावरून सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक बस मध्ये 40 असणे उपलब्ध राहणार असून महिलांना व 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवास दरामध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षांवरील व्यक्तींना प्रवास दरात 100% म्हणजे मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तशी प्रवासी वर्गाने व वारकरी संप्रदाय यांनी सदर सुविधांचा लाभ घ्यावा व वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची राज्य परिवहन महामंडळास संधी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच किमान 30 थेट प्रवासी उपलब्ध असल्यास प्रत्येक स्थानकावरून थेट बस उपलब्ध करून देण्यात येईल तरी राज्य परिवहन महामंडळ सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळात मार्फत करण्यात आले आहे.











