पट संख्या कमी,मात्र अमृत महोत्सव दिमाखदार

इतर शाळांसमोर आदर्श; प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांचे गौरवउद्गार

कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण न. 2 या विद्यालयाचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आलाय.या कार्यक्रमासाठी चार वाडीतील ग्रामस्थ या दिमाखदार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा अमृत महोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी अमृत महोत्सव कमिटीने दिवस रात्र मेहनत घेत प्रयत्न केले.त्याला साथ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने विशेष मेहनत घेत कार्यक्रमासाठी सहकार्य केले.हा कार्यक्रम सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू झालेला कार्यक्रम सोहळा दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता सर्व उपस्थिताणांचे आभार मान्यात आले.असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तांबे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर ,उपशिक्षणाधिकारी थोरात,गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्र प्रमुख अनघा चिपळूणकर,मुख्याध्यापक शरद कदम, शिक्षिका स्मिता कदम, सरपंच,चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे, तंटामुक्त समिती मनोहर प्रभुखोत,अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष शामराव परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहुल घाडी ,खजिनदार तुषार घाडी,संतोष घाडी, अशोक पाताडे, जयप्रकाश पाताडे, प्रशांत तांबे,सुरेश सुतार,देविदास जांभळे,सुदिन तांबे,महादेव परब,दिनेश शिंदे, सदाशिव घाडी,उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर आणि उपशिक्षणाधिकारी थोरात तसेच कणकवली गटविकास अधिकारी किशोर गवस यांचे स्वागत गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत केले.

अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तांबे म्हणाले की, या जिल्हा परिषद शाळेसाठी प्रशासनाचे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या प्रशासनाने आम्हाला वेळीच पूर्ण करून द्याव्यात. ही शाळा म्हणजे आमच्या गावाची छान आहे. ही शाळा कायम कशी सुरू राहील यासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी लक्ष दिले पाहिजे तसेच प्रशासनाने ही याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. या गावापासून इतर शाळेंमध्ये जर जायचं झालं तर जवळपास पाच -पाच किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळे या गावातील मुलं ही शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या छोट्या मुलांना तिथपर्यंत जाणं शक्य नाही.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, या शाळेमध्ये मुलांची पट संख्या अवघी 9 असून सुद्धा अमृत महोत्सव समितीने दिवसभर असा भरगच्च कार्यक्रम करण्याचा धाडस या समितीने केला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या गावातील सर्व ग्रामस्थांचे चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. असे गौरव उद्गार कुडाळकर यांनी काढले. जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण नं2 या शाळेने इतर शाळांमध्ये आदर्श ठेवला आहे अमृत महोत्सव सारखा कार्यक्रम करणे म्हणजे फार मोठं धाडसाचं काम म्हणावं लागेल. मी आजपर्यंत अशा प्रकारचा अमृत महोत्सव जिल्ह्यामध्ये कधीच पाहिला नाही. या कार्यक्रमांमध्ये उत्तम नियोजन कसा असावा हे जिल्हा परिषद शाळा असलदे गावठाण नं 2 या अमृत महोत्सव समितीने करून दाखवले आहे. फार स्वच्छ सुंदर असा शाळेचा परिसर आहे.

कै. तातोबा विश्राम घाडी यांनी गावातील मुलं शिक्षणापासून वंचित राहून नये आणि त्यांची कोणतेही गैरसोय होऊ नये म्हणून त्या काळी त्यांनी स्वखर्चाने इमारत बांधून दिली.या इमारतीला आज 75 वर्ष पूर्ण झाली. आज कैलास वाशी तातोबा विश्राम घाडी यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये हा अमृत महोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी कै. तातोबा विश्राम घाडी यांच्या कुटुंबीयांचा अमृत महोत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.या कुटुंबाने सुद्धा शैक्षणिक कार्यासाठी फार मोठ योगदान दिलं आहे. ज्या व्यक्तीने शाळेसाठी जमीन दान केली त्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.
गावातील ज्येष्ठ नागरीक,सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, आजी माजी शिक्षक वर्ग,उच्च शिक्षित विद्यार्थी,10.वी 12 वी पदवीधर,तसेच राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी त्यांचा देखील सन्मान करण्यात आलाय.तसेच या अमृत महोत्सव समितीने आजी-माजी शिक्षक वर्गांचे सुद्धा सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले

error: Content is protected !!