त्रिंबकच्या सम्राट अशोक नगरला शववाहिका प्रदान

आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील त्रिंबक बौद्ध वस्तीची शववाहक गाडीची बऱ्याच वर्षांची मागणी आज पूर्ण झाली. ग्रामपंचायत त्रिंबक यांजकडे अनेक दिवस स्थानिक बौद्धविकास मंडळ पाठपुरावा करत होते. या कामी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदी दत्ता पवार यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केला. तसेच आज शासकिय अनुदानातून सार्वजनिक जेवणाची भांडीही देण्यात आली. ग्रामपंचायत त्रिंबक येथे झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच किशोर त्रिंबककर, माजी उपसभापती अशोक बागवे, माजी उपसरपंच प्रमोप बागवे, ग्रामसेवक श्रीम.मधुरा कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, साटम, संतोषी सावंत, जेष्ठ कार्यकर्ते दत्ता पवार, स्थानिक अध्यक्ष आणि तंटामुक्ती अध्यक्ष अजय पवार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जाधव, सरचिटणीस गणेश जाधव, उपाध्यक्ष विवेक भगवान जाधव, कार्यध्यक्ष भदंत जाधव आणि बौद्ध बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर मागण्या शक्यतो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी खात्री ग्रामसेवक कामतेकर यांनी या वेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्ता पवार यांनी तर आभार अजय पवार यांनी मानले.

error: Content is protected !!