खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन रस्त्याची दुरवस्था

कोकण रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले चिंचवली येथील प्रमुख रेल्वे स्थानक म्हणजे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन होय.सद्या ह्या स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची फार दुरवस्था झाली असून कोकण रेल्वे प्रशासनाने सुधा याकडे पूर्णतःहा दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण रेल्वे स्टेशन हे मंजूर होण्यासाठी व प्रत्यक्ष स्वरूपात आकराला येण्यासाठी येथील दशक्रोशीतील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला.७ वर्षे या रेल्वे स्टेशनला पूर्ण होतील.मात्र रेल्वे प्रवाशाना देण्यात येणाऱ्या येथील सोयी सुविधांचा येथे वणवाचा आहे.

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा चिंचवली – दिक्षी रस्ता व या रस्त्यावरून खारेपाटण स्टेशन कडे जाणारा रस्ता सद्या डेंजर झोन मध्ये असून रस्त्यावरील खडी वर उकरून आली असून डाबराचा तर कुठेच लवलेश नाही नेमका हा रस्ता कशासाठी बनवला व कुणसाठी बनविला हा प्रश्न जणू प्रवांशाना पडला आहे. या रस्त्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने नेताना सांभाळून न्यावी लागत असून काही दुचाकी स्वार या खडीवरून गाडी घसरून पडल्याचे समजते. तर भविष्यात या रस्त्यवर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून कोकण रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन खारेपाटण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे पुन्हा नव्याने खडीकरण व डाबरीकरण करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!