सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सामंत बंधू आणि राणे बंधू यांचे राजकीय हाडवैर अवघ्या कोकणसह महाराष्ट्राने आजवर अनुभवलंय. मात्र कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरण उर्फ भैयाशेठ सामंत, मंत्री उदय सामंत यांच्या फोटोसह नवा आरंभ नवा विश्वास …असा मजकुराचा दिवाळी शुभेच्छा देणारा बॅनर झळकला आणि जो तो त्या बॅनर कडे उत्सुकतेने बघू लागला. शिवसेनेच्या बॅनर वर सामंत बंधूंसह चक्क माजी खासदार निलेश राणेंचा फोटो झळकला आणि त्याची एकच चर्चा कणकवली शहरासह अवघ्या सिंधुदुर्गात सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी भैयाशेठ सामंत यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत हे राजकीय हाडवैर संपवले. त्यानंतर थेट शिवसेनेच्या बॅनर वर भाजपा प्रदेश सचिव असलेल्या माजी खासदार निलेश राणेंचा फोटो झळकल्यामुळे निलेश राणें नक्कीच मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला आहे.
सामंत – राणे शिवसेनेच्या बॅनरवर साथ साथ ! दिवाळी शुभेच्छा बॅनर ठरतोय लक्षवेधी











