कणकवली कॉलेज येथे जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मान्यतेने व विद्यामंदिर प्रशाला,कणकवली , तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांचे आयोजनात एच पी सी एल हॉल, कणकवली कॉलेज, कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरण पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रा. महालिंगे, मुख्याध्यापक मा. कांबळे ,क्रीडाधिकारी मा विजय शिंदे , प्रा डॉ राजेंद्र मुंबरकर, प्रा. नाईक , प्रा. शेट्ये , तायक्वांडो असोसिएशन सचिव मा. भालचंद्र कुळकर्णी प्रा. अदिती मालपेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. सिंधुरत्न स्पोर्टस् अकॅडमी , कलमठ ट्रेनिंग सेंटरच्या मुलींनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. प्रथम क्रमांक प्राप्त मुली – कु किमया सावंत (सेंट उर्सुला स्कूल कणकवली) देवश्री कणसे (बी एन विजयकर) दिपश्री तेंडुलकर (आयडियल स्कूल, वरवडे) स्विझल डिसोझा (सेंट ऊर्सुला) संयुक्तराजे आबदार (सेंट उर्सूला) संध्या गोंधलकर (एस एम हायस्कूल कणकवली) अदिती ठाणेकर (सेंट ऊर्सुला) लक्ष्मी पाटील (सेंट ऊर्सुला) द्वितीय क्रमांक – काव्या गंवडळकर (पोदार इंटरनॅशनल) सृष्टी लाड (एस एम हायस्कूल कणकवली) प्रथम क्रमांक प्राप्त मुलींची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!