नगर परिषद प्रशासन संचालक कोकण भवन विभागीय कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी नियुक्ती
कुडाळ ( प्रतिनिधी): पीएमजीएसवाय सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता आर.के.बामणे यांची अधीक्षक अभियंता पदी बढती झाली असून त्यांना नगर परिषद प्रशासन संचालक कोकण भवन विभागीय कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी नियुक्ती देण्यात आली आहे.आर. के . बामणे यांची एमपीएससी द्वारे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 पदी खेड उपविभाग रत्नागिरी येथे शासकीय सेवेला सुरुवात झाली होती.त्यानंतर सन 2007 पर्यंत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण रस्ता गुणनियंत्रक नवी मुंबई अंतर्गत कार्यरत होते. 2007 साली बामणे यांना कार्यकारी अभियंता पदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली, राष्ट्रीय महामार्ग विकास विभाग कोल्हापूर, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नवी मुंबई , सार्वजनिक बांधकाम विभाग महाड येथे उत्कृष्ट काम केले.त्यानंतर जून 2022 पासून बामणे यांनी सिंधुदुर्ग पीएमजीएसवाय कार्यकारी अभियंता पदी अत्यंत पारदर्शी आणि लोकाभिमुख कार्यभार संभाळला आहे.कर्तव्यदक्ष अधिकारी आणि दर्जेदार काम करण्यात माहीर अशी बामणे यांची बांधकाम खात्यात ओळख आहे.












